आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या भाजप-शिवसेना युतीमध्ये बरीच धुसफूस निर्माण झाली आहे. फडणवीस सरकारने काही कामे करायला घेतली की शिवसेना त्याला विरोध करते. इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम हा युतीचा संमिश्र कार्यक्रम होता. तिथे शिवसेनेने आमंत्रणाची वाट का बघावी? ते सत्तेत आहेत याचा अर्थ हा कार्यक्रम त्यांचाही होता. पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या प्रकरणात सुधींद्र कुलकर्णीच्या चेहऱ्यावर शाई फेकली. युतीतील या भांडणाचा फायदा सध्या विरोधक उठवत आहेत. धनंजय मुंडे यांनी तर सरळ नवीन निवडणुकीचा सल्ला देऊन टाकला. पुन्हा निवडणुका म्हणजे अफाट पैसा व वेळ खर्च होईल याचे भान मुंडेंना नाही. या सगळ्यात मात्र सामान्य जनता भरडली जाईल. शिवसेनेने आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी. त्यांना सत्तेत राहायचे आहे की विरोधी बाकावर बसायचे आहे? फडणवीस सरकारसोबत कामे करायची नसतील तर सत्तेतून बाहेर पडावे. नेहमीच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेतून अजून ते बाहेर आलेले दिसत नाहीत.