आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगळावेगळा जनसागर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकांचे चुकते कोठे? येत्या 3 मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे मी माझ्या भाच्याची गणित, भूमिती इत्यादी विषयांची उजळणी घेत असताना त्याला सांगितले की, थोडा वेळ इतिहास विषयाची उजळणी घेऊया. त्यावर तो म्हणाला, ‘आत्या, इतिहास किती बोअर विषय आहे.’ त्याच्या या वक्तव्यावर मी म्हणाले, ‘तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना इतिहास विषय बोअर का वाटतो तेच कळत नाही.’ असे म्हणून मी त्याच्या इतर विषयांची उजळणी घेत असताना त्याला जागतिकीकरणाचे तोटे समजावून सांगत होते. त्याला शेवटचा मुद्दा सांगितला, जागतिकीकरणामुळे मूलभूत मूल्यांचा -हास होत आहे. माझ्या या मुद्द्यावर तो म्हणाला, ‘जागतिकीकरणाने मूल्यांचा -हास कसा काय होतो?’ त्याला नाशकात नुकतीच घडलेली त्याच्या वयाच्या मुलांची घटना विशद करून सांगितली. दहावीत शिकणार्‍या दोन मुलांचा अपघात झाला असता जखमी झालेल्या मुलाला मदत करण्याऐवजी अपघाताचे चित्रीकरण करण्यात नागरिक मग्न झाले होते. याचाच अर्थ जागतिकीकरणाने तंत्रज्ञान दिले, परंतु त्याचा वापर करताना आम्ही आमची मूल्ये विसरत चाललो आहोत.

या स्पष्टीकरणानंतर तो म्हणाला, असा विषय आम्हाला कुणी शिकवतच नाही, मग तो बोअर नाही होणार तर काय? भाच्याच्या या वक्तव्यावर मी विचार करू लागले. खरंच, आज सर्वत्र इतिहास विषय शिकवताना अनेक शिक्षक सरसकट पुस्तक वाचून दाखवत असतात. विद्यार्थीदेखील काय करणार? त्यामुळेच खासगी कोचिंग क्लासेसची चलती आहे. त्यांनी शाळेतील शिक्षकांची मानसिकता ओळखली आहे. शिक्षक विषय धड शिकवत नाहीत, विद्यार्थी वर्गातील तासाला दांड्या मारतात. मानवाने इतिहासात केलेली चूक वर्तमानात करू नये याच उद्देशाने इतिहास विषय शिकणे आवश्यक आहे. शिक्षकांनी योग्य तेथे इतिहासाची सांगड वर्तमानाशी घालून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला तर इतिहास विषयातही विद्यार्थ्यांची रुची नक्कीच वाढेल.