आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी माणसासाठी काही करा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘दिव्य मराठी’(4 एप्रिल)च्या अंकात उद्धव व राज ठाकरे यांना अभिलाष खांडेकरांनी लिहिलेले खुले पत्र वाचले. त्यांनी पत्रात जे मुद्दे मांडले आहेत, नक्की तेच मुद्दे जनतेच्याही मनात आहेत. आज महाराष्ट्रात अनेक समस्या आहेत. मराठी माणसाचे अनेक प्रश्न आहेत. महागाई, भ्रष्टाचाराने माणूस गांजला आहे. दोघांनी एकत्र येऊन हे प्रश्न सोडवण्याऐवजी ऐन नववर्षाच्या सुरुवातीला घरातली भांडणे चव्हाट्यावर आणत आहेत. अगदी शिवसेनेतून बाहेर पडलेली मंडळीही त्यांना घरातली भांडणे घरात ठेवा म्हणून सल्ला देत आहेत. बोलताना संयम पाळा म्हणून सांगत आहेत. दोघांनी एकत्र यावे, ही बाळासाहेबांची इच्छा तर बाजूलाच राहिली. अजूनही वेळ गेलेली नाही, दोघांनी बाळासाहेबांच्या अंतिम इच्छेसाठी मनातील द्वेष बाजूला सारून एकत्र यावे. राजचे वक्तृत्व, आक्रमकता वेळोवेळी बाळासाहेबांची आठवण करून देते. उद्धवजवळ संघटनकौशल्य आहे. दोघांनी एकत्र येऊन निम्मे-निम्मे महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशीच भावना मराठी मनात आहे. विधानसभा निवडणुकांच्या वेळी असे झाल्यास नक्कीच बाळासाहेबांची अंतिम इच्छा पूर्ण होऊन त्यांच्या आत्म्यास शांती मिळेल. तसेच विधान भवनावर भगवा फडकेल हे मात्र नक्की!
दिलीप देशपांडे, प्रकाशनगर, जामनेर