आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे धोरण इंग्रजांसारखे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘खंबीर, धडाडीचा नेता हवा’ हा मकरंद दंडवते यांचा आपल्या दैनिकात प्रकाशित झालेला लेख वाचला. बाबरी आंदोलन आणि 2002 च्या गुजरात दंगलीशी तरुण पिढीला फारसे देणे-घेणे नाही असे या लेखात म्हटले आहे. परंतु बाबरी आंदोलनापूर्वी भारतात शांतता नांदत होती. त्यानंतर देशाला जणू दृष्टच लागली. त्यानंतर देशभरात दिवाळीच्या फटाक्यांसारख्या बॉम्बस्फोटांच्या मालिका झाल्या. बाबरीनंतर उत्तर प्रदेशात उसळलेल्या दंगलीत माझा भाऊ मारला गेला. तेव्हापासून आमचे कुटुंब औरंगाबादेत स्थायिक झालो आहे. त्या वेळेसची दहशत, भयाच्या वातावरणाची आपणास आपल्या एसी केबिनमध्ये बसून कल्पना करता येणार नाही. इंग्रजांसारखे ‘फोडा आणि राज्य करा’असे भाजपचे धोरण आहे. मी काही काँग्रेस समर्थक नाही, परंतु मोदी सत्तेवर आल्यास भारताने कितीही प्रगती करो, बाबरी आंदोलनात बळी गेलेले हजारो हिंदू-मुस्लिम नागरिक परत येणार नाहीत.