आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरण शरण जी हनुमंता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रेष्ठ असे विठ्ठलभक्त जगद्गुरू संत तुकाराम महाराज भक्ती कशी असावी यासाठी श्री हनुमंताला प्रार्थना करतात. ते म्हणतात : शरण शरण जी हनुमंता ! तुजपाशी आलो रामदूता ! काय भक्तीच्या त्या वाटा ! मज दावाव्या सुभटा !!’ याचा अर्थ असा होतो की, तुम्ही रामाचे सेवक आणि सुभट म्हणजे चांगले योद्धे आहात म्हणून तुम्ही मला भक्तीच्या वाटा दाखवाव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांनीही राज्याच्या रक्षणासाठी बांधलेल्या किल्ल्यांच्या महाद्वारापाशी हातात गदा घेऊन उभ्या असलेल्या मारुतीरायाची स्थापना केली. युद्धप्रिय आणि लष्करी बाण्याच्या वीर मराठ्यांना त्यापासून प्रेरणा मिळत असे. स्वामी विवेकानंद आपल्या शिष्यांना हनुमानाची जीवनगाथा कथन करून त्यांची मने प्रभावित करत असत. अशा या श्रेष्ठ वीर आणि स्वामितत्पर हनुमंताला श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम.