आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीचा नवा प्रकार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या मोदी यांच्या हाती भाजपचे नेतृत्व एकवटलेले आहे. त्यामुळे मोदी हुकूमशाही आणू पाहत आहेत, अशी विरोधक हूल उठवत आहेत. मोदी लोकशाहीचा नवा प्रकार आणू पाहत असले तरी त्याला हुकूमशाही म्हणणे उचित ठरणार नाही. कारण मोदी हे लष्करी बळावर नव्हे, तर जनमताच्या जोरावर सत्ता मिळवू पाहत आहेत. हा प्रकार स्वीकारायचा की नाही हे जनतेलाच ठरवू द्या. जरी आज काँग्रेस संसदीय लोकशाहीचा कळवळा दाखवत असली तरी मनमोहन सिंग यांची निवड सर्व खासदारांनी मिळून केली होती यावर कोण विश्वास ठेवेल? हा कळवळा सर्वात मोठा विरोधाभास मानला पाहिजे. सपा, बसप, तर कधी तृणमूल यांना हाताला धरून सत्ता उपभोगणारे काँग्रेसवाले तेव्हा का लोकशाहीचा मान ठेवत नाही? केलेली कामे जनतेपुढे मांडण्यापेक्षा फक्त टोकाचा मोदीविरोध दिसून येतो आहे. प्रश्न पडतो की, सत्ताधारी कोण व विरोधक कोण?