आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडफ्रायडे उत्तम का आहे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडफ्रायडे हा दिवस प्रभू येशू ख्रिस्तांच्या मृत्यू दिनाचे स्मरण म्हणून पाळण्यात येतो. प्रभू येशूंचा जन्म दोन हजार वर्षांपूर्वी आशिया खंडात झाला. त्यांनी सर्व देवाच्या राज्याविषयी लोकांना शिकवण दिली. निराश असलेल्या जीवनात नव्या आशा निर्माण केल्या. शोषित-पीडितांना त्यांनी आधार दिला. अनेकांची जाचातून सुटका केली. अनेकांना रोगमुक्त केले. तत्कालीन धर्माचे प्रमुख येशूंच्या चांगल्या कार्यामुळे व अद्भुत शिकवणुकीमुळे हादरले. त्यांनी प्रभू येशूला मृत्युदंड देण्याचा निर्णय घेतला.

येशूसारख्या निष्पाप व्यक्तीचा अत्यंत क्रूर आणि क्लेशदायी मृत्यू का झाला, असा प्रश्न कोणाला पडणे स्वाभाविक आहे. पवित्र बायबल असे सांगते, पापाची शिक्षा मृत्यूच आहे. या जगातील प्रत्येक व्यक्ती पापी आहे. म्हणून सर्व मानवजातीचे पाप येशूने स्वत:वर घेऊन त्या वधस्तंभावर आपला प्राण दिला. येशूंच्या बलिदानामुळे जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी मोक्षप्राप्तीचा मार्ग मोकळा झाला पाहिजे. प्र्रभू येशूने माझ्या पापासाठी क्रुसाच्या खांबावर प्राण दिला, असे ज्या व्यक्तीला वाटते, त्याला स्वर्गीय जीवन प्राप्त होते.