आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार यादीतील गोंधळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेच्या नगर व शिर्डी मतदारसंघातील निवडणुकीसाठी 17 एप्रिलला मतदान झाले. यंदा मतदानाची टक्केवारी वाढली असली, तरी याहीपेक्षा अधिक मतदान नक्की होऊ शकले असते. अनेक मतदारांकडे निवडणूक आयोगाचे ओळखपत्र होते, पण मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. मतदार यादीतील ही हजारो नावे कशी काय वगळली गेली, याविषयी सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. ज्यांनी मतदारांचे सर्वेक्षण करून यादी अद्ययावत केली, त्यांनी यासाठी कोणती पद्धत वापरली, हे समजायला हवे.

एखादे नाव का वगळले गेले हे स्पष्ट झाले, तर दोष नेमका कोणाचा हे कळू शकेल. अनेकदा मतदार यादीचे काम करणारे कर्मचारी चालढकलपणा करतात. त्यामुळे मतदार यादीत अनेक घोटाळे झाल्याचे दिसते. नागरिकांना वाटते, आपण मागील निवडणुकीत मतदान केले होते, ओळखपत्र आपल्याकडे आहे. पण हाच गाफीलपणा नडतो. निवडणूक आयोगाने यापुढे मतदार यादीचे काम शिक्षकांकडे न सोपवता जबाबदार व्यक्तींकडे सोपवावे.