आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना काय करतेय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘शिवसेनेचे वाघ दिल्लीत पाठवा’ अशी सिंहगर्जना करणारी आरोळी ठोकली होती. आता त्यातील काही वाघ दिल्लीत गेले आहेत. मात्र, अजूनही ते डरकाळी फोडताना दिसत नाहीत. तिकडे कर्नाटकात सरकारने पोलिसांच्या मदतीने तेथील मराठी जनतेवर अत्याचार सुरू केले आहेत. कर्नाटक पोलिसांनी येळ्ळूर गावातील मराठी बांधवांवर राक्षसी अत्याचार केल्यानंतर कानडींना आता मराठी धडा शिकवायला पाहिजे. मराठी माणूस वळ उमटेपर्यंत रट्टे खातोय. त्यातच ‘कन्नड रक्षण वेदिका’ या संघटनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी बेळगावमध्ये जाऊन धिंगाणा सुरू केला आहे. सीमाभागात मराठी बांधवांवर कानडींचे हल्ले ताबडतोब थांबले पाहिजेत, यासाठी शिवसेनेच्या वाघांनी मोदी दरबारात मराठी डरकाळी फोडावी आणि हा प्रश्न मार्गी लावावा.