आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यासीन मलिकला हद्दपार करा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिक याने सुरुवातीपासूनच स्वतंत्र काश्मीरसाठी जोर लावलेला आहे. त्यासाठी तो प्रत्येक वेळी पाकिस्तानची मदत मागत असतो. पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत त्याच्या २ ते ३ वेळा बैठकाही झाल्या. ज्या पाकिस्तानला स्वतःच्या देशातील समस्या सोडवता येत नाही, तो काश्मीर मुद्द्यावर काय मदत करणार. यासीन मलिक हा भारतात राहतो, भारताचे खातो आणि भारतविरोधी विधाने करतो. अशा देशद्रोह्यांना मोदी सरकारने हद्दपार करावे. काश्मीरचे मुद्दे मांडताना काश्मिरी जनता आपल्यासोबत आहे, असे त्याचे म्हणणे आहे. तसे असल्यास त्याने निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखवावे. यासीन मलिकला खरोखरच काश्मीर मुद्द्यावर तोडगा हवा असेल तर त्याने नरेंद्र मोदी यांची मदत मागावी, काश्मीर प्रश्न निकाली निघेल. पण त्याचा इरादा काश्मीरला भारतापासून अलग करणे हाच आहे. अशा देशद्रोह्यांना हद्दपार करून कायमचे पाकिस्तानात पाठवावे.