आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात कसली काढता?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ नेत्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केले पाहिजे. एकनाथराव खडसे मुख्यमंत्रिपद मिळाले नाही म्हणून नाराज होणे स्वाभाविक आहे. परंतु महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा कारभार पाहण्यासाठी फक्त बहुजन समाजातीलच मुख्यमंत्री हवा असे म्हणणे म्हणजे आपण अजूनही जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करू शकत नाही याचेच चिन्ह आहे. जनतेने भारतीय जनता पक्षाला बहुमताने निवडून दिले आहे. जनतेने मतदान करताना डोळसपणे मतदान केले आहे. आता दिलेल्या संधीचे सोने करणे हे या पक्षातील सर्वच नेत्यांचे कर्तव्य आहे. तेव्हा पक्षात फूट पडेल अशी वक्तव्ये न करता आपण प्रामाणिकपणे व निष्ठेने काम केल्यास आपल्याबद्दल असलेला आदर अधिक वाढेल. जनतेलाही हे आपले सरकार आहे असे वाटेल. तेव्हा जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करा व पुरोगामी महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करा, अशीच अपेक्षा आपल्याकडून आहे.