आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिकचा वापर टाळावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या प्लास्टिक पिशव्यांच्या कच-यात मोठी वाढ झाली आहे. हा कचरा नष्ट होत नसल्याने जमिनीचे प्रदूषण होत असून जनावरे खात असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या विक्री वापरावर बंदी लादली आहे, परंतु हा विषय केवळ बंदी लादण्याने संपणार नसून नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेण्याची गरज आहे.
नागरिकांमध्ये प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे होणा-या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. नागरिकांनी प्लास्टिकऐवजी दुस-या पिशव्या वापरण्याची गरज आहे. आजकाल कुठलीही वस्तू प्लास्टिक पिशव्यांमध्ये टाकून विकण्यात येते. प्लास्टिकची पिशवी नागरिक रस्त्यावर टाकून देतात. या पिशव्या मोकाट जनावरे खातात. त्यांनाही अपाय होण्याची शक्यता असते.