आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनापासून भावना व्यक्त करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर प्रेम, मैत्री, सुख-दु:खाविषयीचे संदेश सहजपणे मिळतात. ते आपण तत्काळ इतरांना पाठवतो; परंतु हे संदेश जो तयार करतो. त्यामागे त्याच्या भावना, अनुभव असते. तेच आपण कॉपी करून सहज इतरांना फॉरवर्ड करतो. आपले विचार त्या संदेशाशी जुळतात का, आपली कृती त्यानुसार असते का, याचा विचारा व्हायला हवा. फक्त स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हा खटाटोप करत तर नाही ना? याचाही विचार होणे गरजेचे आहे. कृत्रिम निर्मिती फार काळ टिकू शकत नाही. त्याप्रमाणे कृत्रिम भावनाही टिकू शकत नाहीत. भावना मनापासून निर्माण व्हावी. ती व्यक्त करताना मिळणारा आनंद औरच ठरू शकतो. इतराचे विचार कॉपी करण्यापेक्षा आपणच आपल्या आयुष्याचा निर्माता व्हायला हवे.