आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिलिंडरची तारीख द्यावी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधुनिक तंत्रज्ञानामुळे गेल्या काही वर्षांपासून एलपीजी गॅस सिलिंडर नोंद (बुकिंग) करण्याची प्रक्रिया अत्यंत सहज आणि सोपी झाली आहे. आपला नोंदणी क्रमांक, ग्राहक क्रमांक तसेच आपल्या एजन्सीचे नाव तसेच त्यांनी कोणत्या तारखेपर्यंतच्या मागणीचा पुरवठा पूर्ण केला आहे इत्यादी अशा आशयाची माहिती ग्राहकास नोंद करताना केलेल्या फोन कॉलमधून आणि पाठोपाठ येणा-या एसएमएसद्वारे ग्राहकास प्राप्त होते. मात्र, गॅस सिलिंडर अमुक एका तारखेस अथवा त्याचे आसपास मिळू शकेल, असा उल्लेख झाल्यास मधल्या दिवसांत ग्राहकांना आपली अन्य कामांची आखणी करणे सहज शक्य होईल. शिवाय सिलिंडर आज येईल की उद्या, अशी रोजच प्रतीक्षा करावी लागणार नाही. ग्राहकांच्या सुविधेसाठी गॅस कंपन्यांनी ही शक्यता पडताळून पाहून प्रक्रियेत तसा बदल करता येतो का, ते पाहून आणखी ग्राहकोन्मुख होण्याची संधी घ्यावी.