आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींवर भिस्त कशासाठी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेच्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच एकहाती प्रचारयंत्रणेमुळे भाजपने जिंकल्या. मोदी लाटेमुळे आजवर कधी मिळाल्या नाहीत एवढ्या ३८० जागा भाजपला मिळाल्या. त्यानंतर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू-काश्मीर आदी राज्यांतील निवडणुकांत मोदींनाच प्रचारसभा घ्याव्या लागल्या. आतासुद्धा दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींनाचा प्रचारसभा घ्याव्या लागतात.

पंतप्रधानपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असताना भाजपसाठी त्यांनी मते मागत फिरणे योग्य वाटत नाही. भाजपकडे त्यांच्याशिवाय प्रबळ नेता उरलेला नाही का? भाजपच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमातही त्यांनाच लक्ष घालावे लागत आहे. देशासमोर अनेक प्रश्न उभे असताना मोदींनी तिकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. अच्छे दिन येण्याची जनता आतुरतेने वाट पाहते आहे. काळा पैसा विदेशातून कधी येणार आहे, याचे उत्तर पंतप्रधानांनी द्यावे.

केदार किरण कुलकर्णी, औरंगाबाद