आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोलमुक्ती नवी युक्ती ठरावी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांधा, वापरा, हस्तांतरित करा हे तत्त्व मोठ्या रस्ता विकासकामासाठी वापरले जाते. परंतु नेमकी वाहनांची संख्या किती, हा भ्रम कायम असतो. एकीकडे वाहनांची संख्या भरमसाट वाढत आहे. दुसरीकडे टोलची कालमर्यादा वाढत आहे. टोल देऊनही रस्ता गुणवत्ता, इतर सोयींची बोंब सार्वजनिक आहे. अशा वेळी सर्वमान्य अशी युक्ती, योजना येईल. वाहतूक जास्त असलेल्या मार्गाचे २५ ते ३० किमीचे तुकडे पाडून तिथे वजनकाटे, सीसीटीव्ही कॅमेरे ही योजना राबवावी.
वाहतुकीचे नियम मोडणार्‍या वाहनांवर टोल लावण्यात यावा. या कामी सुशिक्षित बेकार, सुरक्षेकरिता माजी सैनिकांची पथके, स्वयंरोजगार तत्त्वावर नेमावे, म्हणजे नियमानुसार चालणार्‍या वाहनचालकांना भुर्दंड पडणार नाही. रस्ते दुरुस्ती, रोजगारासाठी दंडाच्या रूपाने आलेल्या पैशांचा वापर करावा. टोलमुक्ती ही काळाची गरज बनली आहे.
- श्रीकृष्ण लांडे, ई-मेलद्वारे