आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री, एवढे कराच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्यपूर्ण शिक्षणाची कास धरत आहेत. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आता किमान एक लाख रुपये फी भरावी लागणार आहे. शासनानेच फीवाढ केली आहे. ईबीसीची सवलत असणार्‍या मुलांनाही आधी तेवढी रक्कम भरा, शासनाकडून वर्षभरानंतर अनुदान आल्यावर अर्धी रक्कम परत केली जाईल, असे संस्थाचालक सांगतात. गरीब किंवा मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचे पालक इतकी मोठी रक्कम आणणार कोठून? शिवाय आता नोकरीची खात्री नसल्याने बँकांसुद्धा शैक्षणिक कर्जे देण्यास तयार होत नाहीत. हुशार आणि होतकरू मुलांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश घेण्याची इच्छा यामुळे पूर्ण होणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा महाविद्यालयांतील फी कमी करण्याची तरतूद करावी. तसे आदेशच लवकर काढावेत, अशी किमान अपेक्षा.

राज कुलकर्णी, औरंगाबाद