जायकवाडी या मराठवाड्यातील मोठ्या धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. गाळ असाच वाढत राहिला, तर या धरणातील पाण्याच्या साठ्यावर विपरीत परिणाम होईल. सध्या पाण्याचा मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे. अपुर्या पावसामुळे मराठवाड्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे शासनाने तांत्रिक पद्धतीने या धरणातील साचलेला गाळ उपसला, तर सिंचनाची क्षमता आणखी वाढू शकेल.
गाळाचा वापर खत म्हणून शेतीसाठी करता येतो. तसेच पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पाण्याचा गैरवापर थांबेल. पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे. त्यानंतर शेतीसाठी आणि उद्योगासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे.
बा. ज. गोरवाडकर, औरंगाबाद.