आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणी मुरते कोठे?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"लाचार आणि स्वाभिमानी' हा ‘दिव्य मराठी’ (५ फेब्रुवारी)मध्ये प्रसिद्ध झालेला अग्रलेख वाचला. अत्यंत चांगले विचार त्यात मांडले गेले आहेत. माझ्या मते, कृषिमंत्री आणि मुख्यमंत्री ह्यांनी आपल्या विश्वासू पण प्रामाणिक अधिकार्‍यामार्फत शेतकर्‍यांना मदत व्यवस्थित पोहोचते का, याचा आढावा घेतला पाहिजे. कारण शेतकरी म्हणत आहेत पंचनामे झाले, पण अजून मदत मिळाली नाही. अन्यथा जे आघाडी सरकारने केले तेच युतीचे शासनही करत आहे, असे जनतेला वाटेल. त्याचबरोबर पंचनामे करत असताना काही भेदभाव झाला का, हेही पाहिले पाहिजे. गरीब शेतकर्‍यांचे खरोखर नुकसान झाले आहे, ज्यांची बायका-मुले उपाशी आहेत त्यांना ताबडतोब मदत मिळाली पाहिजे, अगदी युद्धपातळीवर हे काम झाले पाहिजे. नवीन सरकार आल्यावर काहीतरी वेगळे आणि चांगले होत आहे, असे वाटले पाहिजे. नुसती पॅकेजची घोषणा नको, प्रत्यक्ष कृती पाहिजे.
डॉ. विजय दामोदरराव पांगरेकर, औरंगाबाद.