आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशाचा हव्यास नसावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात लाचलुचपत खात्याने अनेक ठिकाणी टाकलेल्या धाडी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. यात राजकीय नेते, वरिष्ठ अधिकारी, पोलिस अधिकारी आणि महसूल विभागातील अधिकारी लाच घेताना सापळ्यात अडकले. भरपूर पगार, भत्ते आणि चांगली सुखाची नोकरी असताना ही मंडळी पैशाच्या हव्यासापायी गरिबांकडूनही लाच घेत असतात. शिवा ठाकरे नावाच्या पोलिस अधिका-याने ५ लाखांची लाच मागितल्याचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे. औरंगाबाद महापालिकेकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नवविवाहितेला लाच द्यावी लागली होती. ही सत्य माहिती आमच्याकडे आहे. लाच दिल्याशिवाय कोणताही सरकारी कर्मचारी पेन हातात घेतच नाही. काही मंडळी दुस-या एखाद्या विश्वासू सहका-याकडे संबंधित कामासाठी पैसे देण्यास सांगतात. लाचखोर अधिका-यांना नव्या राज्य सरकारने कठोर शिक्षा देण्याची तरतूद करावी.