आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णा, मुस्लिमांसाठीही लढा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अण्णा हजारे यांनी "जनलोकपाल' विधेयकासाठी मोठा लढा दिला. जनआंदोलनाच्या रेट्याच्या दबावामुळे सरकारला अखेर झुकावे लागले. जनलोकपाल विधेयक मंजूर झाले. त्यामुळे अण्णा हजारे यांना प्रतिगांधी म्हटले जाते. आपल्या लढ्यामुळे लोकांना न्याय मिळतो, असा विश्वास आमच्या मनात निर्माण झाला आहे. तरी मुस्लिम समाजास न्याय मिळवून देण्यासाठी अण्णा, तुम्ही आता पुढाकार घ्यावा. केंद्रातले मोदी सरकार आणि फडणवीस सरकार दूजाभाव करते आहे. हिंदू व मुस्लिमांमध्ये बंधुभाव आहे; गायीला हिंदू समाजात माता मानतात. आम्हाला ते मान्य आहे. पण गोवंशा हत्येवर बंदी कशासाठी? सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी अण्णांनी मुस्लिमांसाठी लढा द्यावा.
शेख शफिक शेख मुसा, औरंगाबाद