आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळा पैसा कुठे गेला?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशात भाजप पक्षाला केंद्रातली सत्ता मिळाल्यास स्वित्झर्लंड आणि परदेशी बँकात भारतीयांनी ठेवलेला ७३ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा देशात परत आणू, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात दिली होती. हा सर्व काळा पैसा भारतात आल्यास देशावरचे कर्जही फिटेल, असेही ते सांगत होते. पण, मागील नऊ महिन्यांत परदेशातला लाखो कोटी रुपयांचा तो काळा पैसा काही भारतात आलेला नाही. मोदी आणि जेटली परदेशातल्या काळ्या पैशाबाबत शब्दही काढायला तयार नाहीत. आपले केंद्र सरकार मात्र गेले नऊ महिने काळा पैसा परदेशी बँकांत ठेवणार्‍या भारतीयांचा फक्त शोधच घेते आहे. याचाच अर्थ दोषींवर कठोर कारवाई करायची मोदी आणि त्यांच्या सरकारची हिंमत नाही, असेच म्हणावे लागेल असे वाटते
प्रा. मधुकर चुटे, नागपूर