आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगाचा स्तुत्य उपक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जागतिक योग दिनाच्या निमित्ताने देशभरात सकाळीच देशबांधवांनी उत्स्फूर्तपणे योगाची प्रात्यक्षिके केली. मुस्लिम बांधवांचा विरोधही मावळलेला दिसून आला. काँग्रेसने मात्र नरेंद्र मोदी योगाचे मार्केटिंग करत असल्याचा आरोप केला, पण मायलेकरे कुठे गायब झाली होती? ते तेथे किंवा दररोज योग करतात का? ते मात्र समजू शकले नाही. भारताची प्राचीन परंपरा असलेला योग आता जगभरात साजरा होतोय, याचा निदान अभिमान तरी बाळगावा. देशात मोठ्या प्रमाणावर कुपोषण चालू आहे, मजुरांना योगाची काय गरज? वगैरे संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर दिवसभर फिरत होते. ते पाहून लोकांची कीव करावी वाटते. योग केल्याने प्रकृती सुदृढच राहण्यास मदत होईल. अनेक आजार दूर पळतील. विरोध केव्हा करावा याचे तरी तारतम्य बाळगावे.
किशोर बाभूळगावकर, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...