आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धान्यापेक्षा साखर महत्त्वाची का ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘डाळीला बोनसचा तडका’ या दिव्य मराठीतील (२० जून) अग्रलेखाद्वारे शेती पिकांचे किती निकृष्ट नियोजन आहे ते दाखवून दिले आहे. मागील दहा वर्षांत अनेकदा दुष्काळ पडला तरी साखरेचे अन् तांदळाचे विक्रमी उत्पादन होत आहे अन् तृणधान्य आणि कडधान्य यांचे मात्र फारच कमी उत्पादन होत आहे. ऊस अन् तांदळासारख्या पिकाला जास्त पाणी लागते, यावर शेतकर्‍यांनी पिकांचे नियोजन करण्याची गरज आहे. कमी पाण्यावर येणारी पिके घेतल्यास शेतकर्‍यांना आर्थिक फायदा होतो आणि दुष्काळाचा सामनाही करता येतो. त्याचप्रमाणे सर्व जीवनावश्यक पिकांवर बोनस जाहीर केला तर त्या सर्व पिकांचे उत्पादन नक्कीच वाढीस लागेल अन् देशात कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही.

ज्ञानेश्वर गायकवाड, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...