आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षणावर गहजब का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच मराठा आरक्षण जाहीर होते आणि लगेच त्यावर याचिकाही दाखल होते. याचिकेतील मुद्दे वाखाणण्याजोगे आहेत. मराठा समाज प्रगत आहे. या समाजातील ९९% मुख्यमंत्री, शिक्षण व साखरसम्राट आहेत. मग मराठा शेतकरी व शहरी भागातील मराठा समाज मोठ्या प्रमाणावर मागास का? याकडे आरक्षण विरोधकांचे लक्ष का जात नाही? एखाद्या गोष्टीला विरोध करायचा अन् राजकारण करायचे. मराठ्यांना जर आरक्षण नसेल तर मग इतर आरक्षित प्रवर्गात किती लोक आरक्षणास पात्र आहेत? त्यातही सर्वच इतके मागास तर नक्कीच नाहीत. त्यांना आरक्षणाच्या कुबड्यांची गरज का असावी? मराठा समाजाचे दुर्दैव आहे की इतके मंत्री असूनही त्यांनी सारी हयात राजकारण आणि खेळ करण्यात घालवली. त्यामुळे फक्त त्यांचाच विकास झाला, मराठा समाजाचा नव्हे.

श्याम शिंदे, औरंगाबाद