आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपातांचे प्रमाण चिंताजनक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात १५ वर्षांवरील ३० हजार महिलांनी गर्भपात केल्याची नोंद सरकार दरबारी आढळून आली. त्यात १५ ते १८ वयोगटातील जवळपास १८०० मुलींनी आपला गर्भपात केला, ही धक्कादायक माहिती नक्कीच गंभीर बाब आहे. राज्यात विविध ठिकाणी गर्भपाताच्या किट्स, कामोत्तेजक औषधांची विक्री राजरोसपणे सुरू आहे. मुली व महिला डॉक्टरांच्या मार्गदर्शनाशिवाय गर्भपाताच्या गोळ्या घेत आहेत. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा औषधांच्या ऑनलाइन विक्रीवर तसेच त्याच्या जाहिराती आणि वेबसाइटवर बंदी घालायला पाहिजे. सरकारने गर्भपाताचे प्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना आखायला पाहिजेत.
प्रा. मधुकर चुटे, नागपूर.
बातम्या आणखी आहेत...