आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिझर्व्ह बँकेचा निर्णय धोकादायक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
10 वर्षे पूर्ण करणार्‍या लहान मुलांना कोणत्याही पालकाच्या देखरेखीशिवाय स्वतंत्रपणे खाते उघडण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे. यानुसार 10 वर्षांपुढील मुले आता आपल्या बँक खात्यात कोणताही व्यवहार करू शकतील, तसेच एटीएमही वापरू शकतील. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कदाचित रिझर्व्ह बँकेने असे धोरण राबवले असावे. मात्र लहान मुलांच्या हाती बँक खाते सोपवणे खूप धोकादायक ठरू शकते. आयुष्याचे फक्त 10 पावसाळे पाहिलेल्या या मुलांना पैशाचे मूल्य, त्यांचा वापर कसा करावा याबाबतचे पुरेसे ज्ञानही मिळालेले नसते. सध्याची पिढी खूप वेगवान आणि समंजस झाली आहे, हे मान्य असले तरी कोणतेही पालक मुलांच्या हाती बँक खाते आणि पैसे सहजासहजी सोपवणे शक्य नाही. पण रिझर्व्ह बँकेने परवानगी दिल्यामुळे मोठमोठे उद्योजक, व्यावसायिक, नेत्यांसारख्या धनदांडग्यांनी आपल्या मुलाची हौस म्हणून त्यांचे स्वतंत्र बँक खाते सुरू करून दिल्यास अगदी नकळत्या वयापासूनच मुलांच्या हाती पैसा खेळू लागेल. या पैशांचा योग्य पद्धतीने वापर न झाल्यास अशा गैरमार्गांचा संसर्ग त्याच्या इतर मित्रांना होऊन सामान्यांची मुलेही बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलाची क्षमता, स्वभाव आणि परिपक्वता जाणूनच त्याच्या हाती बँक खाते सोपवावे