आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी घेतलेला निर्णय अयोग्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग श्रीक्षेत्र औंढा नागनाथ (जि. हिंगोली) येथे सुरक्षेचे कारण पुढे करत यात्रा काळात मंदिराच्या तीनपैकी एकच दरवाजा उघडा ठेवला जाणार असल्याचे श्री नागनाथ संस्थानला पाठवलेल्या पत्रात पोलिसांनी म्हटले आहे. श्रावणी सोमवारी भगवान शिवाच्या मंदिरात पूजेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते आणि त्यात हे ज्योतिर्लिंग असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी या ठिकाणी अधिक बंदोबस्त लावून मंदिराचे तिन्ही दरवाजे खुले केले पाहिजेत. इतर सोमवार आणि श्रावणी सोमवार यात खूप फरक आहे. याची कल्पना नसल्याप्रमाणे चुकीचे निर्णय घेऊन पोलिसांनी आपल्या चुकीच्या निर्णयांद्वारे भाविकांना त्रास होऊ न देण्याची मेहरबानी करावी.