आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरींवरील टीका पूर्वग्रहदूषित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम आदमी पार्टीची देशभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे. वास्तविक भाजपला संघाच्या शिस्तीत वाढलेल्या नेत्यांचे पाठबळ आहे. भाजप व काँग्रेस पक्षाला राजकारणाचा दीर्घ अनुभव असूनही या पक्षातील शिस्तीची लक्तरे पाहण्यास मिळत आहेत. सातत्याने या दोन्ही पक्षातील सदस्य पक्षांतर करत आहेत. जे ज्येष्ठ सदस्य आहेत ते माध्यमांसमोर तोंड उघडायच्या आधी पार्टी हायकमांडची पूर्वानुमती घेतात. दोन्ही दीर्घ परंपरा असलेल्या पक्षातील बंडाळ्या व ज्येष्ठ नेत्यांची बालिश विधाने पाहता, आम आदमी पार्टीला टीकेचे लक्ष्य करण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. काही महिन्यांचा आप व त्याचे तरुण संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्या विधानांची खिल्ली उडवणार्‍यांनी आत्मपरीक्षण करावे. नरेंद्र मोदी वयाने ज्येष्ठ असूनही अत्यंत चुकीचे ऐतिहासिक तपशील सातत्याने देतात. राहुल यांना तर घराण्याचा वारसा असल्याने सर्व चुका माफ आहेत. त्यांच्याच वयाच्या एका सामान्य पार्श्वभूमीच्या अरविंद केजरीवाल यांना मात्र टीकेचे लक्ष्य केले जात आहे. सामान्य घरातल्या व आर्थिकदृष्ट्या तुलनेने दुर्बल असूनही केजरीवाल तत्त्वासाठी लढत आहेत. तेजोवलय व घरंदाज नेत्याच्या संकल्पनेला तोडण्याचा प्रयत्न करणार्‍या केजरीवालांचा प्रयत्न नक्कीच इतिहासात दखलपात्र ठरेल, यात माझ्यासारख्या सामान्य माणसाला शंका नाही.