आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकांगी विश्लेषण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिव्य मराठी’च्या 20 जूनच्या संपादकीय पानावर अरुणा बुरुटे यांचा लेख वाचला. समाजात जातीय सलोखा टिकून राहावा यासाठी हा लेख लिहिल्याचे वरकरणी दिसते. समाजात कट्टरतावादी लोक केवळ एकाच धर्मात आहेत, असे गृहीत धरूनच लेखिकेने विश्लेषण केले आहे, असे दिसते. पुणे येथे मुस्लिम तरुणाचा विनाकारण बळी गेला. त्या प्रकरणात दोषी असणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, परंतु त्या प्रकरणाचा तपास पूर्ण होण्याआधीच लेखिकेने ठाम निष्कर्ष काढून एका संघटनेला जबाबदार धरल्याचे दिसते. गेल्या महिनाभरात तामिळनाडूत चार हिंदू नेत्यांची कट्टरवाद्यांकडून क्रूरपणे हत्त्या झाली. पुणे प्रकरणाच्या एकशतांशही चर्चा माध्यमांनी केली नाही. यातून माध्यमे एकांगी वृत्तांकन व विश्लेषण करतात, असे दिसून येते. यामुळे एका समाजावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण होऊन कट्टरता वाढीस लागते, असे मला वाटते. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या संवेदनशील विषयांचे तटस्थ विश्लेषण व्हावे, असे वाटते.