आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसारामबापूंचा अवैज्ञानिक सत्संग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळीपूर्वीच रंग खेळणारे आसारामबापू यांचा विज्ञानाशी दूरदूरचा संबंध असावा असे वाटत नाही. नागपुरात पाण्याचा तुटवडा असताना अनुयायांच्या अंगावर हजारो लिटर पाण्याचे फवारे सोडले. नवी मुंबईतही टँकरद्वारे पाणी मागवून रंग उडवले. एका न्यूज चॅनलवर त्यांचे अनुयायी डॉक्टर सांगत होते, बापू फक्त पळसांच्या फुलांचा रंग खेळतात. त्यामुळे माणूस रोगमुक्त होतो. पळसाच्या फुलांनी जर माणसाचे रोग नाहीसे होत असतील तर मोठमोठे दवाखाने काढण्याची गरजच काय होती? बापू म्हणतात, मार्चनंतर मीठ खाऊ नका. मार्चनंतर ऋतुमान बदलते. घामामुळे शरीरातील लवणाची मात्रा मोठ्या प्रमाणावर कमी होते. म्हणूनच गॅस्ट्रो झाल्यानंतर सलाइनद्वारे सोडियमचा पुरवठा केला जातो. त्यामुळे शरीरातील लवणाचे प्रमाण संतुलित राहते, पण बापूंना विज्ञानाशी काय देणेघेणे? त्यांच्या पदरी कार्यरत असणारे डॉक्टरसुद्धा वैद्यकशास्त्राचा अपमान करतात.