आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संप मागे... आंदोलन मात्र सुरूच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘आयएमए’ने पुकारलेला बीड जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांचा बेमुदत संप अवघ्या दीड दिवसात मागे घेतला. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांच्या बैठकीत सर्व डॉक्टरांच्या प्रश्नावर साधकबाधक चर्चा झाली. संघटनेचं समाधान झालं अन् संप मागे घेण्यात आला. या संपाने सर्वसामान्यांच्या मनात मात्र कित्येक प्रश्न उभे
ठाकले. डॉ. गौरी राठोड यांनी स्त्री भ्रूणहत्येत आरोपी असणा-या एका स्त्रीरोगतज्ज्ञावर मोक्का लावण्याची शिफारस केली. त्यामुळे येथील सर्व डॉक्टरांना यापुढे स्त्री भ्रूणहत्येव्यतिरिक्त इतर छोट्या-मोठ्या चुकांवरही मोक्का लावण्याची भीती निर्माण झाली. गेले दोन महिने त्या दहशतीखाली वावरणा-या इतर चांगल्या डॉक्टरांच्या भावनांचाही उद्रेक झाला आणि सर्वांनी संपाचे हत्यार उपसले. संप करताना जनतेला वेठीस धरण्यासाठी कोणाचेही मन धजावत नव्हते. राठोड मॅडमसोबत फिसकटलेल्या वाटाघाटी या त्यांच्या मनात खदखदत असणारी भीती व्यक्त करीत होत्या. आयएमएच्या डॉ. पैठणकरांनी डॉ. राठोड मॅडमच्या वक्तव्याचा कुठलाही विपर्यास न करता, मनात कुठलीच अढी न ठेवता चांगल्या मनाने रुग्णांची सेवा करा, असे आवाहन केले. तेव्हाच आयएमएच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट झाली. तूर्तास संप मागे घेतला तरी रुग्णसेवेचे व्रत पार पाडत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. कारण हे आंदोलन प्रथम स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध... यापुढे स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी आयएमए जागरूक असेल, तर या संपाबाबत जनसामान्यांत केवळ स्त्री भ्रूणहत्या करणा-या डॉक्टरांसाठी हा संप होता, अशी चुकीची भावना निर्माण होऊ नये.
डॉ. संजय जानवळे, बीड, ई-मेलद्वारे
बीड शहरातील 300 डॉक्टरांचा बेमुदत बंद
स्त्री भ्रूणहत्या - बीड जिल्ह्याच्या माथी लागलेला कलंक पुसता पुसेना