आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयरीक जमली !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐतिहासिक औरंगाबादच्या गारखेडा भागातील रस्त्यावर एक टपरी जरा वेगळीच, टुमदार आणि मोक्याच्या जागेवर आहे. एका झाडाच्या आधाराखाली वा सावलीत ती असल्याने येणा-या -जाणा-या ला तिथे क्षणभर विसावण्याचा वा चहा घेण्याचा मोह होतो. बांधकामावर जाणारे मजूर, ठेकेदार यांचे ते जमण्याचे ठिकाणच ठरलेले होते. सकाळच्या वेळेस कायमच कामगार-मजूर विद्यार्थी बॅचलर्स यांनी गजबजलेली ही टुमदार टपरी नेहमीच अनेक हृदयस्पर्शी घटनांची
साक्षीदार असे. अनेक कामगार आपल्या सुख-दु:खाची चर्चा तिथे करत असत. ख-या अर्थाने ते कम्युनिटी सेंटर होते. अशा या जिवाभावाच्या टपरीवर एकदा दोन मित्र ब-या च दिवसांनी भेटले. त्यांनी एकमेकांच्या मुलांची चौकशी केली आणि गेले. मात्र दुस-या दिवशी भेटायचे हे ठरवूनच. दुस-या दिवशी ते एकमेकांना भेटले. गोपाळ म्हणाला, ‘विष्णूराव, तुमची परवानगी असेल तर एक गोष्ट बोलावं म्हणतो.’ ‘बोला की गोपाळराव, बिनधास्त बोला. आपण मित्र मग कशाचे?’ तसे गोपाळराव म्हणाले, माझ्या मुलासाठी मी तुमच्या मुलीला मागणी घालतो. विष्णूराव क्षणभर स्तब्ध झाले. मनात आनंदले व म्हणाले, अरे, कालपासून मी पण हाच विचार करतोय. माझी काही हरकत नाही. मीही तुला हेच विचारणार होतो. पण घरी विचारलंस काय, गोपाळराव म्हणाले, हो, तू पण विचार बाबा घरी. सगळं ओके असलं, पसंती झाली तर पुढील विचार करता येईल. ही टपरी तशीही मला लकीच आहे, असा माझा अनेकदाचा अनुभव आहे. पुढे त्यांची सोयरीक जुळली. मात्र त्याचे ठिकाण ती टपरीच होती. त्यामुळे आजही ते कधी-कधी या टपरीवर येतात आणि आठवणीने गहिवरून जातात.