आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वडिलांच्या हृदयाचे ऑपरेशन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी इयत्ता पाचवीत शिकत होतो. नऊ ते दहा वर्षांचा असेन. माझ्या वडिलांना सारखा दम लागायचा व घाम यायचा. एकदा त्यांची प्रकृती अचानक बिघडली. आम्ही त्यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले होते. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली आणि वडिलांच्या हृदयातले दोन व्हॉल्व्ह खराब झाले असल्याचे सांगितले. यावर उपाय म्हणजे व्हॉल्व्ह बदलणे, ऑपरेशन करणे तेही मुंबईला. 1996 मध्ये व्हॉल्व्ह बदलण्याची सोय औरंगाबाद शहरात नव्हती. त्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च लागणार होता. सर्वांच्या मदतीने आम्ही एक एक रुपया गोळा करून पैसा उभा केला. 20 जून 1996 रोजी मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये वडिलांना अ‍ॅडमिट केले आणि 28 जून रोजी त्यांचे ऑपरेशन पार पडले.
डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून तब्बल नऊ तास हृदय बाजूला काढून हे ऑपरेशन केले होते. त्यामुळे ऑपरेशन झाल्यानंतरही वडील सुमारे पाच दिवस शुद्धीत आले नव्हते. डॉक्टर सांगायचे ते कोमात आहेत. काहीच भरवसा नाही. मला तेव्हा मामाच्या गावाला सोडण्यात आले होते. आम्ही सर्वजण देवाकडे प्रार्थना करायचो. गावातील काही मंडळी वडिलांसाठी देवळात जप करायची. शेवटी वडील पाच दिवसांनी कोमातून बाहेर आले, पण त्यांचा एक हात आणि पाय कायमचा निकामी झाला. वडिलांचे प्राण वाचले याचाच आम्हाला मोठा आनंद झाला. वडील सुखरूप आहेत. आजही आम्ही देवाचे आभार मानतो. देवावर विश्वास ठेवा, तो सगळे चांगलं करतो हेच खरे.