आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेतील गोंधळ जनतेच्या जिवावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यापमं, चिक्की घोटाळा व ललित मोदी या प्रकरणांवरून मागील काही दिवसांपासून संसदेचे कामकाज ठप्प आहे. यामुळे रोज काही कोटी रुपयांची हानी झाली. हा सर्व भुर्दंड मात्र सर्वसामान्य माणसालाच आहे, तरीही काही प्रमाणात सामान्य माणूस धरणे, आंदोलनांच्या रूपाने याला पाठिंबा देत आहे. काही मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी संसद दीर्घ कालावधीपर्यंत बंद पाडणे हे देशाला परवडणारे नाही. देशात भ्रष्टाचार एवढा बोकाळला आहे की, कोणत्याही पक्षाचे राज्य आले तरी त्याला पायबंद घालणे अशक्य आहे. केवळ राजकीय लोकच भ्रष्टाचार करता असे नाही, तर अवैध कामे वैध करून घेण्यासाठी सामान्य माणूसही यात गुरफटला जातो. अनेक ठिकाणी तर काही त्रुटी नसली तरी पैसे देण्याचा पायंडा पडला आहे.