आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जातीच्या फायद्यासाठीच...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वच पक्ष निवडणुकीत जातपात न पाहता, उमेदवारी देण्याचे आश्वासन देतात. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या कथनी आणि करणीत फरक आढळतो. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचेच उदाहरण पाहा. काँग्रेसने उमेदवारी घोषित करण्यास जाणूनबुजून विलंब केला. त्यानंतर गेल्या विधानसभेत पराभूत झालेले नितीन पाटील यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात आता जातीवर आधारित प्रचार होत असल्याची चर्चा आहे. दिव्य मराठीतच (7 एप्रिल) ‘मराठा समाजाच्या धु्रवीकरणाबाबत...’ चे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्याने माझ्या मताला दुजोराच मिळतो. त्याचबरोबर विविध पक्षांनी नव्या कार्यकर्त्यांना तिकिटे देऊ असे म्हटलेले असले तरी ज्याची निवडून येण्याची क्षमता म्हणजे, पैसा, घराणेशाहीचा वारसा असेल त्यालाच उमेदवारी दिली आहे. राजकारण म्हणजे घराणेशाही आणि पैशाचा खेळ झाला आहे. त्याला आम आदमी पार्टी येऊ नही फरक पडणार नाही.