आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी करून काय मिळणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एका रिक्षाचालकाने मारहाण केली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांकडून नेत्यांना अशी मारहाण करणे संतापजनक आहे. अशा घटना वारंवार घडताना दिसतात. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावरही यापूर्वी अशाच एका माथेफिरूने हल्ला चढवला होता. राजकीय नेत्यांना अशा रोषाला सामोरे जावे लागते, असेही म्हटले जात असले, तरी निवडणुकीच्या काळात अशा मारहाणीच्या अथवा हिंसाचाराच्या घटना मन विषण्ण करणार्‍या आहेत. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वादावादीत सामान्य कार्यकर्त्यांत हाणामारी जुंपते, अनेकांची डोकी फुटतात. मतदानाच्या दिवशीही हिंसाचाराच्या घटना अनेक ठिकाणी घडतात. या घटना चिथावणीखोर नेत्यांच्या मानसिकतेचे परिणाम आहेत. त्याला कार्यकर्त्यांनी बळी पडू नये.
निवडणुका संपताच सर्व राजकारणी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हिंडताना दिसतात. मग कार्यकर्त्यांनी आपसात हाणामार्‍या करून वैरभावना ठेवण्याची गरज काय?