आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिवचण्याचे उद्योग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘दिव्य मराठी’ (९ जून) मध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचा प्रसिद्ध झालेला लेख वाचला. आक्रमक धर्मांध ब्राह्मणशाहीकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. एखाद्या वाईट प्रवृत्तीला विशिष्ट जातीचे नाव देणे कितपत योग्य आहे? निखिल वागळे यांनी जातीयवादी मंडळींच्या दुष्ट प्रवृत्तीला आक्रमक धर्मांध ब्राह्मणशाही असे संबोधले आहे. ब्राह्मण जातीचे नाव वाईट प्रवृत्तीला देऊन जातीयवादाचा अधिक ऊहापाेह करणे योग्य नाही. ब्राह्मण जातीचे नाव बदनाम करण्यासाठी ब्राह्मणी वृत्ती, आक्रमक ब्राह्मणशाही असे शब्द योजून निष्कारण डिवचण्याचा व वाद उकरण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. ज्येष्ठ असलेल्या पत्रकार निखिल वागळे यांनी देशाहितासाठी जातीचा उल्लेख टाळावा असे आवाहन आहे.