आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादचे उर्दू शायरीतील लेणे हरपले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शायरी विश्वात आपले नाव अजरामर करणारे औरंगाबादचे जिंदादिल शायर, केवळ उर्दू भाषेचे नव्हे, तर भारतीय भाषेचा उर्दू मोहरा आणि मराठवाड्याचे लेणे बशर नवाज यांच्या निधनाने औरंंगाबादची शान हरपली आहे. बशर नवाज हे महाराष्ट्राचे भूषण होते. त्यांची साधी राहणी व ते सरळ स्वभावाचे विचारवंत, कवी होते. तसेच ते औरंगाबादच्या उर्दू संस्कृती व सभ्यतेचे महान प्रतीक होते. बाजार हिंदी चित्रपटातील शायरीने बशर नवाज भारतीय आकाशातील प्रदिप्त चंद्र ठरले. कुछ लोग उर्दू को मुस्लिम की भाषा बना दिया, अब इसके जख्म कौन भरेगा ? असा प्रश्नही ते उपस्थित करीत. बशर नवाज साहब, करोगे याद तो हर मौज याद आयेगी ....
दिखाई दिये यूं के बेखुद किया, हे आपल्या हृदयातील शब्द सदैव स्मरणात राहतील.
बातम्या आणखी आहेत...