आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukta Vyaspith On Divay Marathi Magazine Madhurima

मुलींची मानसिकता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मुलीच मिळत नाहीत’ (मधुरिमा, 30 मे) हा हर्षाली घुले या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने लिहिलेला लेख वाचला. तरुणाई या समस्येवर विचार करते आहे, हे पाहून बरे वाटले. लोकसंख्येतील स्त्रियांचे घटते प्रमाण हा चिंतेचा विषय आहे. साठेक वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती, परंतु त्यावेळची आणि आजची कारणे वेगवेगळी आहेत. आजची परिस्थिती आपण ओढवून घेतलेली आहे. हुंडा, मानपान, खोटी प्रतिष्ठा सांभाळताना मुलीचा बाप पिचून निघतो. समाजात आजही सोयरीक ठरवताना मुलाच्या बापाला जेवढी सामाजिक प्रतिष्ठा मिळते तेवढी मुलीच्या बापाला मिळत नाही. स्त्री भ्रूणहत्येमागचे हे प्रमुख कारण असावे. शिकलेल्या मुली उद्योग, धंदा, शेती व्यवसाय करणार्‍या शिकलेल्या मुलांशी विवाह करायला तयार नाहीत. शहरात कुठलीही नोकरी करणारा चालेल, परंतु खेड्यातला नको, असे खेड्यातल्या मुलींनाही वाटते. मुलींच्या अपेक्षा वाढल्याने व्यवसाय, शेतीउद्योग करणार्‍या तरूणांची पंचाईत झाली आहे. वय वाढत चालले पण मुलगी कोणी देईना, अशी समस्या निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येतून तरुणाई, त्यांचे माता-पिता आणि समाज यांनी मार्ग काढावयाचा आहे. अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती होऊन काही पुरुष आयुष्यभर अविवाहितच राहतील.
पवनपुत्र हनुमान बामणीकर,
मु. पो. बामणी, ता. जि. (उस्मानाबाद)