आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरोगाम्यांना आता काय सांगायचे आहे!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील आरोग्य खात्यातील ‘महाशल्यचिकित्सक' (सर्जन जनरल) या सर्वोच्च पदावर भारतीय वंशाच्या ३७ वर्षीय विवेक हल्लेगेरे मूर्ती यांची नेमणूक झाली आहे. भारतीय वंशाच्या अधिकाऱ्याला मिळालेले ओबामा प्रशासनातील हे सर्वोच्च पद आहे. त्यांनी नुकतीच या पदाची शपथ घेतली. मूर्ती यांनी हिंदू धर्मातील श्रीमद् भगवद्गीता या पवित्र ग्रंथावर हात ठेवून शपथ घेतली. भगवद्गीतेवर टीका करणाऱ्या भारतातील पुरोगाम्यांना ही सणसणीत चपराक आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या आहारी जाऊन स्वतःच्या धार्मिक ग्रंथांची अवहेलना करणाऱ्या पुरोगाम्यांना याविषयी काय म्हणायचे आहे? अमेरिकेतील आरोग्य खात्यातील महाशल्यचिकित्सक विवेक मूर्ती यांच्यापेक्षा हे पुरोगामी स्वतःला श्रेष्ठ समजतात? भारतीय संस्कृतीची खरी ओळख आपल्यापेक्षा परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाच जास्त आहे.
विशाल पुजार, ई-मेलद्वारे