आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवलेले पाकीट मिळाले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आम्हा आठ मैत्रिणींचा ग्रुप हैदराबादला सहलीसाठी गेला होता. बिर्ला मंदिर, लेझर शो, चारमिनार श्रीशैल्यम,महानंदी हे करून आम्ही आइस वर्ल्ड बघण्यास गेलो. तिथे आम्ही बर्फ खेळलो, फोटो काढले. थोड्या वेळाने आम्ही सगळ्या मैत्रिणी बसकडे आलो. गाडीत बसल्यानंतर राणा मावशी म्हणाल्या, ‘माझे पाकीट नाही आणि त्यात दहा ते पंधरा हजार रुपये असतील.’ त्यातल्या काहींनी अंदाज सांगितला, ‘आपण बर्फ खेळलो त्या ठिकाणी ते पाकीट पडले असेल.’ पटकन उतरून आम्ही तिघीजणी शोध घेऊ लागलो. आम्हाला हॉलमध्ये जाताना अडवण्यात आले. तेथील माणसाने आम्हाला अडवले, ‘तुम्हाला तिकिटाशिवाय जाता येणार नाही.’ पण आम्ही जेव्हा त्यांना सांगितले की, आमचे पैसे हरवले आहेत ते शोधण्यास जात आहोत, तेव्हा त्यांनी जाऊ दिले. आम्ही हॉलमधून बाहेर येत असताना तीन मुले देवासारखी आमच्याकडे आली. त्यांनी आम्हाला विचारले,‘ काय शोधता, काय हरवले?’ तेव्हा राणा मावशी म्हणाल्या, ‘माझे पाकीट हरवले आहे.’ ती मुले म्हणाली, ‘पाकिटाचा रंग सांगा.’ मावशीने रंग आणि त्यावरचे नाव, त्यात पैसे किती आहेत ते सांगितले. तेव्हा त्या मुलांनी पाकीट मावशीच्या हवाली केले. मावशींना खूप आनंद झाला. त्या तिघांपैकी एक छावणी, दुसरा अरिहंतनगर व तिसरा संगमनेरचा राहणारा होता. हे सर्व औरंगाबादहून आलेले होते. त्यांना आम्ही बक्षिसी देऊ केली होती, पण त्यांनी ती स्वीकारली नाही. आम्हाला फक्त आशीर्वाद द्या, असे म्हटले. असेच संस्कार सर्व मुलांवर झाले तर जगात कुठेही चोर्‍या होणार नाहीत. ज्या मुलाला पैसे मिळाले होते तो म्हणाला, हे पैसे घेऊन मला रात्रभर झोप नसती आली. मी ती एखाद्या ट्रस्टला दान करणार होतो. असेच विचार सर्व मुलांचे असावेत. परत एकदा आम्ही सर्व मैत्रिणींनी त्या मुलांचे खूप आभार मानले.