आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘एक राष्ट्र एक भाषा’ धोरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्या विभागांना आणि सोशल साइट्सवर सरकारी कामकाजासाठी राष्ट्रभाषा हिंदीचा जास्तीत जास्त वापर व्हावा, असे आदेश दिले आहेत, ते अतिशय योग्य आहेत. पण या निर्णयाविरोधात माकप नेते, जयललिता व करुणानिधी, ओमर अब्दुल्ला आदी आक्षेप घेत आहेत. आता राहिला प्रश्न दक्षिण भारत आणि तेथील नेत्यांचा. आज दक्षिण भारतात आंध्र प्रदेश, कर्नाटक किंवा तामिळनाडू या प्रांतात गेल्यानंतर त्या लोकांना हिंदी भाषा समजत नसल्याने गोंधळ उडतो. त्यांनाही उत्तर भारतात गेल्यानंतर हा अनुभव येतच असेल. ‘एक राष्ट्र एक भाषा’ समीकरण जर अमलात आणले तर प्रांतवाद कमी होण्यास मदत होईल, पर्यटनात वाढ होईल, सर्व भारतीय जोडले जातील. आपले विचार, साहित्य- सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढेल, त्यामुळे राष्ट्रभाषा हिंदीचा वापर जास्तीत जास्त व्हावा, या निर्णयाला प्रांतिक पक्षांनी विरोध करू नये.