आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukta Vyaspith On Karnataka And Maharashtra Border Issue

कन्नडिगांचा महाराष्ट्रद्वेष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘महाराष्ट्र राज्य, येळ्ळूर’ असा मराठीतील फलक काढण्यास विरोध करणार्‍या गावातील मराठी भाषकांच्या घरात घुसून कर्नाटक पोलिसांनी लाठीमार केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावांत असे दुर्दैवी प्रकार अधूनमधून होतच असतात. अनेक वर्षे सीमावाद कोणत्या ना कोणत्या कारणाने लक्षात राहिला आहे. दुसर्‍या राज्याच्या व्यक्तींबद्दल एवढा पराकोटीचा तिरस्कार असणे म्हणजे महाभयंकर प्रांतवादाचे लक्षण आहे. ही धुसफुस पेटती ठेवण्यासाठी जे कोणी कार्यरत आहेत, त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने कठोर पावले उचलणे अत्यावश्यक आहे. मराठी माणसांवर लाठ्या बरसत असताना महाराष्ट्राच्या विरोधात बोलणारे गप्प का ? आता त्यांचे कोणीही देशात कुठेही राहू शकतो याबाबतचे विचार गेले कुठे ?