आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरडाही ‘लाजेल’ असे 'केजरीवाल'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माणूस शिक्षणाने कितीही उच्चशिक्षित असला तरी चारचौघांत कसे वागावे, बोलावे याची अक्कल त्याला पुस्तकी ज्ञानातून मिळत नाही. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘आप’चे अरविंद केजरीवाल. लोकसभा निवडणुकांत सपाटून मार खाल्ल्यावर जनतेसमोर येण्यासाठी आता काहीच कार्यक्रम न उरल्याने त्यांनी जामीन न स्वीकारता जेलमध्ये राहण्याची खेळी खेळली आहे. प्रसिद्धीसाठी कोण कुठल्या थराला जाईल याचा काहीच भरवसा नाही. असे करून पुन्हा एकदा आपण जनतेच्या नजरेत येऊ , त्यांची सहानुभूती मिळवू वगैरे आशेवर झुरत राहणार्‍या केजरीवाल आणि कंपनीवर जनतेचा विश्वास नाही. ‘पोटात एक आणि ओठात एक’ असा दुटप्पीपणा करणार्‍यांबद्दल जनतेत तीव्र असंतोष आहे. पोलिस, सामान्य जनता आदींची फरपट करणार्‍या केजरीवालांनी, जनता जागृत झाली आहे. ती जर भडकली तर तुम्हाला बाहेर फिरणेही मुश्किल होऊन बसेल, हे ध्यानात घ्यावे.