आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायक मेटे गप्प का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी अरबी समुद्रातील शिवछत्रपतींच्या स्मारकाला सद्हेतूने केलेला विरोध सहन न झाल्याने आमदार विनायक मेटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केतकर यांच्या घरावर दगडफेक केली होती. त्यावरून बराच गदारोळही झाला. कालांतराने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी शिवस्मारकांसाठी लागणारा पैसा गरजूंना घरे पुरवणे इत्यादी चांगल्या कामासाठी केला जावा, अशी भूमिका घेतली व शिवस्मारकास जाहीर विरोध दर्शवला; परंतु मेटे यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. आता एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांनी शिवस्मारकाऐवजी गोरगरिबांसाठी इस्पितळे उभारावीत अशी भूमिका घेत शिवस्मारकास विरोध केला आहे. आता विनायक मेटे या दोन्ही नेत्यांचा कसा समाचार घेतात, ते बघायचे! शिवरायांनी कधीही दुर्बल माणसावर हल्ले केलेले नाहीत. याची जाणीव त्यांना प्रेरणास्थानी मानणाऱ्या मराठा बांधवांनी ठेवावी.
बातम्या आणखी आहेत...