आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारचा निर्णयांचा धडाका!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑक्टोबर २०१४ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासन विकासकामांच्या जाहिरातीवर कोट्यवधींचा खर्च करत आहे. जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी नव्हे काय? निवडणुका येताच एकापाठोपाठ एक घोषणा करण्याचा धडाका सरकारने लावला आहे. सत्तेत भागीदारी करणाऱ्या शरद पवारांनी फायलीचा निपटारा लवकर होत नसल्याबद्दल हाताला लकवा मारला असल्याची टीका केली होती. आता मात्र निर्णय पटापट घेतले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्यदनिी दिलेल्या संदेशात लोकप्रतिनिधींनी येत्या २ वर्षांत एक तरी गाव आदर्श बनवून दाखवण्याचे आवाहन केले आहे. हा चांगला निर्णय होऊ शकतो. केवळ मतांसाठी प्रलोभनाचा वापर टाळून नागरी विकासासाठी काही स्थायी उपाययोजनेचा लाभ करून दिला तर त्या मतदानाला खरा अर्थ प्राप्त होईल. लोकप्रतनििधींनी या कामाकडे लक्ष दिल्यास त्यांच्याच कामाचा लेखाजोखा जनतेसमोर जाईल. त्यासाठी जाहिरातीसारखा खर्च करण्याची वेळही येणार नाही. पर्यायाने जनतेच्या पैशाची बचत होईल.