आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान भवन परिसरात पोलिस अधिकार्याला लोकप्रतिनिधींनी केलेली मारहाण कशाचे द्योतक आहे? गाडी सुसाट वेगाने नेल्यावरून या पोलिस अधिकार्याने आमदारांना कायदा दाखवला. तेव्हा ते दुखावले गेले. त्यांच्या मते हम करे सो कायदा! आम्ही लोकांनीच यांना निवडून दिलेले आहे. आमच्याकडे लायसन्स असो अथवा नसो, आम्ही काहीही करू शकतो. कशीही गाडी चालवू शकतो. आम्हाला कोणी अडवायचे नाही. गृहमंत्र्यांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आवरायला हवे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे, हे दाखवून दिले पाहिजे. या प्रकरणात पोलिसांचे खच्चीकरण न करता त्यांचे मनोधैर्य वाढवण्यास मदत होते. भविष्यात कोणी अशी मुजोरी करण्याचे धाडस करणार नाही. मुजोर लोकांवर कारवाई करण्याची गरज आहे. तरच सरकारवरील विश्वास वृद्धिंगत होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.