एकेकाळचे जगप्रसिद्ध असे "नालंदा विश्वविद्यालय' नव्याने सुरू झाल्याने समाधान वाटले. विद्यापीठाचे सर्वच विभाग कार्यान्वित होण्यास काही अवधी लागेल; पण पुनश्च श्रीगणेशा झाल्याने विविध विषयांवरील ज्ञानासाठी या नगरीचे द्वार उघडले आहे. शालेय स्तरापासूनच इतिहास विषयामध्ये विद्यापीठाबाबत सकारात्मक माहिती वाचनात आली. ज्ञानाचे भांडार असलेले विद्यापीठ त्या वेळी जर भक्ष्यस्थानी पडले नसते तर आजमितीपर्यंत देश, जगभरातील विद्यार्थ्यांना या ज्ञानगंगेचा लाभ घेता आला असता. जेव्हा देशात लोकशाही मार्गाने शासन स्थापन झाले, तेव्हा किंवा तद्नंतरच्या काही वर्षांत तरी शासनाने या विद्यापीठास सावरण्यासाठी पुढाकार घेतला असता, तरी ज्ञानार्जनाचे महत्कार्य सुरू झाले असते. विद्यापीठ बंद राहून खूप मोठा काळ गेला, तरी या ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश घेण्याकरिता जगभरातील हजारो विद्यार्थ्यांकडून अर्ज येणे दर्शवते की "जुने तेच सोने' असते.