आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नमो नमो करीत फुलले कमळ !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या दहा वर्षांत भ्रष्टाचाराचा चिखल तयार झाला आणि ‘कमळ’ फुलण्यासाठी आवश्यक वातावरणनिर्मिती होत गेली. अन्यथा जातीयवादी, धर्मांध पक्ष असा समज वा गैरसमज असलेला भाजप पुन्हा सत्तेत येणे हे असंभव नसले तरी अवघड मात्र होते. कारण काँग्रेस आणि पुरोगामी आघाडीचे अन्य घटक पक्ष यांची पाळेमुळे खेड्यापाड्यांत अजूनही खोलवर रुजलेली आहेत हे नाकारता येणार नाही. भाजपनेदेखील अडवाणी किंवा इतर कुठल्याही राष्ट्रीय नेत्याला प्रोजेक्ट केले असते तरी बदलाचे वारे इतक्या मोठ्या प्रमाणात कदाचित वाहिले नसते. परंतु संपूर्ण देशाला भुरळ पाडणारे विकासाचे मॉडेल आणि इंडिया यूथला हवा असणारा कणखर नेता या सर्व गोष्टी नरेंद्र मोदी यांच्यात असल्याने भाजपने जनतेचा कौल लक्षात घेऊन पंतप्रधानपदासाठी घोषित केलेल्या मोदींची लहर संपूर्ण देशात प्रकर्षाने जाणवली. तसेच या वर्षी प्रत्येक ठिकाणी वाढत गेलेला मतदानाचा टक्कादेखील महत्त्वाची भूमिका बजावण्यास कारण ठरला.